Type Here to Get Search Results !

मोठ्या राजकीय समीकरणांची सुरुवात उध्दव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची मध्यरात्री वर्षावर गुप्त भेट?

 राज्यातील राजकारणाला नवा कलाटणी देणारी एक मोठी चर्चा सध्या जोर धरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या अधिकृत निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा समोर आला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे महत्त्व अधिक वाढले आहे. नेमकी ही भेट का झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर नसली तरी अनेक तर्क-वितांना उधाण आले आहे.


ही चर्चा एका द्विटमुळे पेटली आहे. प्रबुद्ध भारत या माध्यम संस्थेने सूत्रांच्या आधारे केलेल्या दाव्यानुसार, ठाकरे आणि फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाली. मात्र, या भेटीचे स्वरूप, कालावधी किंवा चर्चेचे विषय याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. तरीही, हा दावा समोर आल्यानंतर राज्यातील अस्वस्थता राजकीय वातावरणात निर्माण झाली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या भेटीचा संबंध विधान परिषद निवडणुकीशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका अंदाजानुसार, ठाकरे हे विधान परिषदेसाठी इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. जर त्यांनी निवडणूक लढवली नाही, तर महाविकास आघाडीच्या गणितांवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत महायुतीला अतिरिक्त फायदा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काही तज्ज्ञांचे मत असेही आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला राजकीय उत्तर देण्यासाठी ठाकरे यांची विधान परिषदेत उपस्थिती भाजपसाठीही फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे या भेटीमागे राजकीय समन्वयाचा प्रयत्नअसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments