नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडण्यासाठीची प्रक्रिया बुधवार, १९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. दरम्यान पहिल्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या दोन तर नगरसेवक पदाच्या पाच अशा एकूण सात उमेदवारांनी रणांगण सोडले. निवडणूक विभागाकडून नोंदीनुसार नगरपालिकेतील अचलपूर नगराध्यक्ष पदाच्या दोन उमेदवारांनी मैदान सोडले असून, नगरसेवक पदाच्या एका उमेदवारानेही माघार घेतली
आणि आहे. याशिवाय मोर्शी येथील ३ दर्यापूर येथील नगरसेवकपदाच्या एका उमेदवारानेही माघार घेतली आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील १० नगरपालिका व 2 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवकांच्या २७८ जागांसाठी १०८ तर १५१६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी किती जण मैदानात कायम राहतात आणि किती जण माघार घेतात, हे मंगळवारी २५ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे
.

Post a Comment
0 Comments