शासनाची खरेदी करा अशी मागणी वारंवार सभापती सुनील गावंडे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व त्यांचे सहकारी यांनी केली होती अखेर कापूस खरेदी व सोयाबीन खरेदी चा शुभारंभ करण्यात आला दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघ दर्यापूर च्या आवारामध्ये आज किसान आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 26 सोयाबीन खरेदीचा शुभारंभ आज सकाळी 11 वाजता शेतकरी सदन गोदाम या ठिकाणी करण्यात आला आचारसंहिता असल्यामुळे पुढाऱ्यांना बाजूला ठेवण्यात आले व शासकीय सहाय्यक निबंधक कार्यालय अधिकारी सौ हुरबडे मॅडम यांच्या हस्ते तर कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अंकिता गणेकर (कासवे) यांच्या उपस्थितीत पार पडला त्याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे सचिव राजूभाऊ गावंडे कृषीउत्पन्न बाजार समिती कर्मचारी डी आर जामनिक व त्याचबरोबर त्याप्रसंगी खरेदी विक्री संघ अध्यक्ष गजानन जाधव उपाध्यक्ष प्रभाकर कोरपे डॉक्टर दिनकरराव गायगोले, कैलास अघडते, आधी शेतकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते

Post a Comment
0 Comments