Type Here to Get Search Results !

युवकांचा नवा अध्याय यश गजानन लवटे यांचा अंजनगाव शहराच्या कायापालटाचा ध्यास

 अंजनगाव शहरात सध्या बदलाची नवी चाहूल लागली असून, स्थानिक राजकारणात तरुण, अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्वाची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार यश गजानन लवटे हे नाव अंजनगावच्या विकासाशी जोडले जाऊ लागले आहे. केवळ निवडणूक राजकारणापुरते मर्यादित न राहता, शहराच्या दीर्घकालीन सर्वांगीण विकासाचा आराखडा घेऊन ते जनतेसमोर उभे ठाकले आहेत. यश गजानन लवटे है उच्चशिक्षित असून समाजातील विविध घटकांशी त्यांचा थेट संवाद आहे.

 नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर अभ्यासपूर्ण उपाययोजना सुचवणारा युवक म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे. त्यामुळेच शहरातील तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मध्यमवर्गीय घटकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. यश गजानन लवटे हे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र असल्याने अंजनगाव शहराला विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाची जोड मिळत आहे. आमदार गजानन लवटे यांचा आणि विविध प्रशासनातील अनुभव, शासनदरबारी असलेला प्रभावी पाठपुरावा विकासकामांसाठी निधी मिळवण्याची क्षमता यश लवटे यांच्या स्थानिक पातळीवरील सक्रिय नेतृत्वाला बळ देणारी ठरत आहे.


 नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रश्न तातडीने मार्गी लावणे आणि त्याचबरोबर विधानसभेच्या पातळीवर त्यांचा पाठपुरावा होणे, अशी नगरपालिका-विधानसभा समन्वयाची साखळी निर्माण होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे अंजनगावच्या रखडलेल्या प्रश्नांना गती मिळेल, असा विश्वास निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments