Type Here to Get Search Results !

नवीन वर्षात दर्यापूर तालुक्यात १ ते ३ जानेवारी पाणीपुरवठा बंद

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूर अंतर्गत १५६ गावे व २ शहरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या शहानुर जलशुद्धीकरण केंद्रात अत्यावश्यक दुरुस्ती व जोडणीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने नवींन वर्षाच्या सुरुवातीस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहानुर जलशुद्धीकरण केंद्रात ६०० मि.मी. व्यासाची पाईपलाईन साठवण टाकीस जोडणे, मुख्य लाईनकारील एअर व्हॉल्व बदलणे तसेच इतर तांत्रिक कामे करावयाची असल्याने दि. २ जानेवारी २०२६ ते ३ जानेवारी २०२६ या कालावांत जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहत अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे. या योजनेअंतर्गत येणाऱ्या १५६ गावांतील व २ शहरांतील नागरिकांनी आगाऊ पाण्याचा साठा करून ठेवा तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन शेंडे, उपविभागीय अभियंता, म.जी.प्रा. जलव्यवस्थापन उप


विभाग, दर्यापूर यांनी केले आहे. या सूचनेची प्रत आमदार (दर्यापूर मतदारसंघ), कार्यकारी अभियंता म.जी.प्रा. जलव्यवस्थापन विभाग अमरावती, उपविभागीय अधिकारी (राजस्व) दर्यापूर, तहसीलदार दर्यापूर व अंजनगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती दर्यापूर व अंजनगाव तसेच मुख्याधिकारी नगर परिषद दर्यापूर व अंजनगाव यांना देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments