दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बोराळा येथील २३ वर्षीय महिलेने गाव तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.2/12/2025) दुपारी १.३० ते २ वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रियंका राजेश निंबाळकर (वय २३) असे मृतक महिलेचे नाव असून तिने पतीपासून एक ते दिड वर्षांपासून घटस्फोट घेतला होता. तेव्हापासून ती वडिलांकडे बोराळा येथे राहत होती. सदर घटना गावातील नागरिकांच्या लक्षात येताच तिला तातडीने उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय, दर्यापूर येथे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला असल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले सदर घटनेसंदर्भात मर्ग डायरी प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती खल्लारचे ठाणेदार रवींद्र बारड यांनी दिली.

Post a Comment
0 Comments