नगर परिषद दर्यापूरच्या अध्यक्षपदासाठी व नगरसेवक पदासाठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. मंदाकिनीताई सुधाकरराव भारसाकळे या प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असल्याचे संकेत प्रत्येक मतदान केंद्रावर दिसून आले.
दर्यापूर, बनोसा व बाभळी परिसरात सर्वत्र मंदाकिनीताईंच्या नावाचीच चर्चा मतदारांच्या तोंडी होती. मतदानादरम्यान कार्यकर्ते व मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. विरोधकांच्या तुलनेत काँग्रेसला मिळणारा लोकसमर्थनाचा कौल अधिक ठळकपणे जाणवला, या यशामागे सर्व समाजघटकांचे मोठे योगदान असल्याचे चित्र समोर आले आहे. मुस्लिम, बौद्ध, पाटील, मातंग, मारवाडी, गुजराती आदी विविध समाजघटकांनी एकत्र येत काँग्रेसच्या इंझेंड्याखाली आपला मतदानाचा हक्क बजावून सौ. मंदाकिनीताई सुधाकरराव भारसाकळे यांना भरघोस पाठिंबा दिला आहे. सौ. मंदाकिनीताई यांच्या उमेदवारीची घोषणा होताच मतदारांमध्ये उत्साहाची लाट उसळली होती. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे पती सुधाकरराव पाटील भारसाकळे यांनी केवळ राजकारण न करता समाजहिताला प्राधान्य देत अठरा पगड जातीतील नागरिकांसाठी नेहमीच सहकार्य केलेला आहे. गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आज मतांच्या रूपाने परतफेड करत असल्याचे जाणवत आहे.
सध्या शहरात व परिसरात काँग्रेसच्या 'पंजा' चिन्हाचीच हवा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सौ. मंदाकिनीताई भारसाकळे या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्ये अस्वस्थता व धाकधूक निर्माण झाली आहे.

Post a Comment
0 Comments