Type Here to Get Search Results !

दर्यापूर तालुका व शहर काँग्रेस वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 दर्यापूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी न्याय समता आणि मानवी मूल्याचा प्रकाश देणारा त्यांचा विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतो त्यांच्या कार्याला विनम्न नमन करताना त्यांच्या आदर्शाना आपल्या आचरनातून जपूया असे त्यांनी म्हटले. यावेळी भावी नगराध्यक्ष मंदाकिनीताई भारसाकळे, दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आतिष शिरभाते, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव ईश्वर बुंदेले, मा.नगरसेवक रामेश्वर चव्हाण, शिवाजी देशमुख, उद्धवराव नळकांडे, असलम घानिवाले, रामेश्वर तांडेकर, नितीन गावंडे, असलम मंसूरी, अजय देशमुख, राहुल गावंडे, आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments