Type Here to Get Search Results !

संसदेच्या हिवाळी अधिवेशना मध्ये खासदार बळवंत वानखडे यांचा अमरावती रेल्वे स्टेशन स्थलांतरास त्रिव विरोध


 अमरावती लोकसभा मतदारसंघाचे

खासदार बळवंत वानखडे यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संसद भवन येथे बोलताना अमरावतीशी संबंधित एका अतिशय गंभीर मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अमरावती रेल्वे स्टेशन जे ब्रिटीश काळातील वारसा असून शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि नागरी विकासाच्या केंद्रस्थानी आहे ते स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर त्यांनी कडाडून टीका केली.

काही लोकप्रतिनिधी हे स्टेशन स्थलांतरित करून त्याची मोक्याची जमीन व्यावसायिक प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचा जो प्रस्ताव पुढे आणत आहेत, ते भू-माफियांना फायदा पोहोचवण्याचे गंभीर षड्यंत्र असल्याचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी संसदेत स्पष्ट केले, अमरावतीचे नागरिक, उद्योगपती, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्व सामाजिक क्षेत्रांतून याला होत असलेला विरोध लक्षात घेऊन, खासदार वानखडे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडे खालीलप्रमाणे ठाम मागण्या केल्या आहेत.

प्रस्ताव रद्द कराः अमरावती रेल्वे स्टेशन स्थलांतरित करण्याचा कोणताही प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा., उच्चस्तरीय चौकशीः या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि कालबद्ध चौकशी करून भू-माफियांना मदत करणाऱ्या दोषींना उघडकीस आणावे.. उड्डाणपुलाची दुरुस्तीः स्टेशन चौक ते राजकमल चौक उड्डाणपुलाची दुरुस्ती तात्काळ सुरू करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाला देण्यात यावेत, विकास व सुविधाः अमरावती रेल्वे स्थानकाचा विकास, प्रवाशांच्या सुविधांचा विस्तार आणि नवीन गाड्यांची मागणी जलदगतीने मंजूर करावी 

या गंभीर विषयावर सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी आग्रही भूमिका खासदार बळवंत वानखडे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडली आहे.

Post a Comment

0 Comments