दर्यापूर नगर परिषदेची निवडणूक मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडली असून त्याचा निकाल येत्या २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम यंत्रणा पालिका भवनातील स्ट्रॉगरूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून २४ तास कडक निगराणी ठेवण्यात आली आहे. ईव्हीएम मशिनच्या सुरक्षेसाठी दर्यापूर पोलिस व एसआरपीचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दर्यापूर पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व पाच पोलीस अंमलदार तसेच एसआरपीचा एक अधिकारी व आला आठ जवान असा पोलिस फौजफाटा या ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे. याशिवाय अमरावती येथील पोलिस दलाचाही बंदोबस्त पालिका परिसरात ठेवण्यात . स्ट्रॉगरूमच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असून अनधिकृत व्यक्तींना पालिका परिसरात प्रवेशास पूर्णक्त मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारांवर सुरक्षा तपासणीसाठी विशेष यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.
दरम्यान, निकालास २० दिवसाचा कालावधी असल्यामुळे ईव्हीएम संदर्भात शहरात विविध अफवा पसरविल्या जात होत्या. मात्र प्रशासनाच्या कडेकोट उपाययोजना व कड़क सुरक्षा व्यवस्थेमुळे अशा अफवांना पूर्णतः विराम मिळाला आहे. ईव्हीएम सुरक्षित असून कोणताही गैरप्रकार होणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे
.

Post a Comment
0 Comments