Type Here to Get Search Results !

नितीश कुमार 10 व्यंदा बिहार चे मुख्यमंत्री. .......

 नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गांधी मैदानावर झालेल्या भव्य समारंभात पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ भाजप नेते उपस्थित होते.


सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकूण २६ आमदार मंत्रीपदाची शपथ घेत होते.


हरियाणा, आसाम, गुजरात, मेघालय, उत्तर प्रदेश, नागालँड, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थानचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. चिराग पासवान यांनी व्यासपीठावर मांझी आणि जेपी नड्डा यांना चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले.


यावेळी नितीश यांच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. रामकृपाल यादव आणि श्रेयसी सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. चिराग यांच्या पक्षातील दोन आमदारांना मंत्री बनवण्यात आले आहे, ज्यात संजय सिंह यांचाही समावेश आहे.


संजय सिंह यांनी लालू यादव यांचे पुत्र तेज प्रताप


यांचा पराभव करून महुआ येथून निवडणूक जिंक

ली होती.

Post a Comment

0 Comments