तिवसा येथील मा. मंत्री यशोमती ताई ठाकुर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, जनप्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मा. नगराध्यक्ष वैभव वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी राऊत, प्रणव गौरखेडे, काँग्रेस तालुका महासचिव विश्वजीत बाखडे, गौरव चौधरी, यश करडे, आकाश मकेश्वर, राज निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमातून इंदिरा गांधी यांचे कार्य, त्यांचे नेतृत्व व देशासाठीचे योगदान यांचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या जयंतीनिमित्त देशासाठी सेवाभावाची प्रेरणा घेण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. वक्त्त्यांनी इंदिरा गांधींच्या ठाम नेतृत्व देशहितासाठी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे निर्माण झालेली प्रगतीची दिशा, त्यांचे बलशाली राजकारण आणि राष्ट्रनिर्माणातील भूमिकेची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या जिद्दी, चिकाटी आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा आजही युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments