Type Here to Get Search Results !

दर्यापूर शहरातील रत्नाबाई राठी हायस्कूल येथे पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

 श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित रत्नाबाई राठी हायस्कूल, दर्यापूर येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आणि राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन आणि हारर्पण कलाशिक्षिका मीनल कावडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी मुख्याध्यापक विलास मुळे यांच्या हस्ते झाले.


निलेश काळे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्यावर भाषण सादर करून कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी मुख्याध्यापक विलास मुळे यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षिका मीनल कावडकर, अश्विनी बुरघाटे, ज्यूली जामठे, सारिका उपासे, आरती मालवे, रुपाली चिकटे, ऋतुजा गावंडे व टोबरे सर उपस्थित होते.



अश्विनी बुरघाटे यांनी इंदिरा गांधी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विलास मुळे यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनाचे महत्त्व स्पष्ट करत धर्म, जात, पंथभेद विसरून ऐक्य टिकवण्याचे आवाहन केले. तसेच इंदिरा गांधी यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. कार्यक्रमाचे संचलन व आभारप्रदर्शन निलेश काळे यांनी केले.

Tags

Post a Comment

0 Comments