नगरविकास खाते आणि केंद्र सरकारच्या समन्वयाच्या काही विषयावर एनडीएचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना एनडीएचे नेते काही काळानंतर भेटत राहतात ही आमची परंपरा आहे. एकनाथ शिंद भाजपवर नाराज आहे या बातम्या संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. शिंदेंनी भेट घेतली ती स्थानिक स्वराज्य संस्थेत युतीला बहुमत मिळावे यासाठी होती, ते भाजपवर नाराज नाहीत, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्यायचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. निवडणूक आयोगाने २७ टक्के ओबीसी आणि सर्व मिळून आरक्षण दिले आहे. ओबीसींचे २७टक्के आरक्षण कायम राहिले पाहिजे ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एनडीएची भूमिका आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीच्या समन्वय समितीमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकनाथ शिंदे, यांच्यासह मी सुद्धा आहे. त्या समितीमध्ये हे ठरले आहे की मित्रपक्षामथील कोणाचाही पक्ष प्रवेश करायचा नाही. पण जेव्हा स्थानिक पातळीवर तिकीट मिळत नाही तेव्हा पदाधिकाऱ्यांना मित्रपक्षांत जात तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पक्षात असे झाले तिन्ही पक्षांचे लोक एकडे-तिकडे गेले आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी नाही.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळणार नाही हे लक्षात आले की स्थानिक पदाधिकारी पक्ष बदलतात. एखादा व्यक्ती जर पक्षात येण्यासाठी तयार असेल तर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा लागतो. यामुळे काही पक्ष प्रवेश होत राहतात, त्यातून एकनाथ शिदि नाराज होतील आणि अमित शहा यांची भेट घेतली यामध्ये काही तथ्य नाही. पक्षप्रवेशामध्ये देवेंद्र फडणवीस आणि माझ्यासोबत ते समन्वय साधतात. एवढ्या कारणासाठी ते अमित शहा यांच्याकडे गेले नाही. एकनाथ शिंदे यांनी एनडीएचे नेते म्हणून राज्याच्या विकासासाठी अमित शहा यांची भेट घेतली आहे.

Post a Comment
0 Comments