नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा १७ नोव्हेंबर हा अंतिम दिवस असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विविध पक्षांच्या दिग्गजांची उपस्थिती होती.
शिवसेना शिंद गराच्या नगराध्यक्षपदी प्रदीप मलिये यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी माजी खासदार तथा शिंदे सेनेचे केंद्रीय पदाधिकारी आनंदराव अडसूळ तसेच भारतीय जनता पक्षाच्या नलिनी भारसाकळे यांचा अर्ज भरतेवेळी भाजपाचे अकोटचे आ. प्रकाश भारसाकळे, काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकळे यांचा अर्ज भरतेवेळी खा. बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे यांची उपस्थिती होती. काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांनी मोठा गाजावाजा करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल पालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरताना दिग्गजांची उपस्थिती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बबलू कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर एम. आय. एम.कडून अदनान मारचिया, शिवसेना उबाठाकडून डॉ. भावना भुतडा गावंडे यांनी अर्ज दाखल केला. एकूण सहा जणांनी नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे दर्यापूरची निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शक्तीप्रदर्शन करत रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेसनेसुद्धा कार्यकर्त्यांची मोठी फळी उपस्थित ठेवत शक्तीप्रदर्शन केले. आतापर्यंत विविध पक्षांतील जवळपास १३४ जणांनी नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Post a Comment
0 Comments