गेल्या दहा वर्षापासून दर्यापूर नगर परिषदेच्या माध्यमातून कुठल्याही ठोस विकास कामांची पावती दर्यापूर वासियांना मिळाली नाही पालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास होणे है क्रमप्राप्त आहे परंतु अलीकडच्या काळात पालिकेच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावण्यासाठी टक्केवारीचे प्रमाण वाढले असल्याने विकास कामांना खिंडार पडल्या गेली टक्केवारी वाढल्याने कामाची विश्वासार्हता कमी झाली असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो त्यासाठी नियोजनबद्ध व पारदर्शक कारभार हा महत्त्वपूर्ण ठरतो
दर्यापूर शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून घंटागाड्याची अनियमितता रस्ते नाल्या याकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत होते ते नियमित करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची पालिकेला नितांत गरज आहे यासह दर्यापूर शहरांमध्ये हद्दवाढ झालेल्या भागात अद्यापही भौतिक सोयी सुविधा पूर्ण झाल्या नसून त्या पूर्णत्वासनेने गरजेचे आहे नागरिकांना शिक्षण आरोग्य व भौतिक सेवा सुविधा ह्या पालिकेच्या माध्यमातून प्राधान्याने पुरवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सौ मदाकिनीताई भारसाकळे अध्यक्षपदाच्या उमेदवार यांनी मत व्यक्त केले

Post a Comment
0 Comments