Type Here to Get Search Results !

दर्यापूर नगरपरिषद निवडणुकीतून मनसे ची माघार

 दर्यापूर मनसे तालुका अध्यक्ष यांच्या पत्नी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील अशी बातमी सोशल मीडियावर झळकली होती. त्यामुळे मनसे पदाधिकारी यांनी तात्काळ पदाधिकारी यांची बैठक बोलावली. त्या बैठकीत चर्चा करून मनसेचा कोणताही पदाधिकारी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करणार नाही, असे जाहीर केले. यावेळी उपतालुका प्रमुख पंकज कदम यांनी सांगितले की, शिवसेनेचे सोबत आम्ही स्थानिक पातळीवर सन्मानाने युती करणार होतो व शिवसेनेने आम्हाला जागा ही दिल्या होत्या. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी नगर पालिकेच्या निवडणुका न लढवण्याचे आदेश दिल्यामुळे आम्ही निवडणूक न लढण्याचे ठरविले आहे. परंतु आमची स्थनिक पातळीवर युतीची चर्चा झाली असल्यामुळे आम्ही युतीचा निर्णय घेऊन शिवसेना ऊबाठाला पाठिंबा देण्याचे बैठकीत ठरले असून लवकरच पत्र काढून जाहीर पाठींबा घोषित करू असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मनसे दर्यापूर तालुकाप्रमुख मनोज तायडे, पंकज कदम तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य शिवर, संदीप झळके शहराध्यक्ष, दर्यापूर प्रथमेश राऊत मनविसेना तालुकाध्यक्ष, अनिकेत सुपेकर, बंडू सांगोले, गोपाल पाटील तराळ, मेहर ठाकरे, राम शिंद व इतर पदधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments