आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती येथे विविध शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी आदिवासी उमेदवारांना विनामूल्य पूर्व-प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सत्राचा प्रशिक्षण कालावधी १ डिसेंबर २०२५ ते १५ मार्च २०२६ असा साडेतीन महिन्यांचा आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थीना दरमहा हजार रुपये विद्यावेतनही देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणात गणित, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांचे मार्गदर्शन केले जाईल, यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य दिला जाईल. तसेच, प्रशिक्षणस्थळी मोफत अभ्यासिका आणि आवश्यक पुस्तके उपलब्ध आहेत.
उमेदवार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा, वय १८ ते ३० वर्षांदरम्यान असावे. किमान एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणीकृत असावे.
इच्छुक व पात्र अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत "आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प, पस्तवाडा' या कार्यालयात सादर करावेत. उमेदवारांच्या निवडीसाठी सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. निवड यादी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल, अधिक माहितीसाठी 07223-221205 किंवा 7709432024 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आदिवासी उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी
November 18, 2025
0
Tags

Post a Comment
0 Comments