अमरावती शहरासह जिल्ह्यात थंडी वाढली असून, पारा १२.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात घशाला खवखव, घसा दुखणे, सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखीचे रुग्ण वाढले. संसर्गजन्य आजार असल्याने घरात एकाला हा संसर्ग झाला की, इतरांनाही संसर्ग सर्दी, खोकला, तापाचा त्रास होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले.
सध्या वातावरणात बदल झाला आहे. थंडी वाढली आहे. या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे सर्वच वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली असून दररोज १ हजारच्या वर लहान मुले, तरुण आणि वयोवृद्ध नागरिक जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाह्यरुग्ण विभागात दररोज मागील दहा दिवसांपासून ३५० ते ४०० रुग्ण वाढले आहेत. शहरी आरोग्य केंद्रांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठीऔषधांचा पुरेसा साठा आहे. इंजेक्शन, सर्दी, खोकला, तापाचे औषध उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मागणी आली की, औषधं पुरवली जात आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत नसल्याचे मनपा आरोग्य विभागाने सांगितले.
अचानक थंडी वाढल्याने घशात खरखर, सर्दी, खोकला, तापाची साथ आली आहे. यात रुग्णानंच इतरांना आपल्यापासून संसर्ग होऊ नये याबाबत काळजी घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा, डॉक्टरांकडून उपचार घ्या असे डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, यांनी सांगितले
,

Post a Comment
0 Comments