दर्यापुर ते आसेगाव या महत्वाच्या मुख्य रस्त्यावर रामगाव ते नरदोडा या दरम्यानचा रस्ता अक्षरशः चाळण झालेला असून नागरिकांचे हाल अक्षरशः झाले आहेत. खड्ड्यांनी वेढलेल्या या रस्त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून नोकरदार.शेतकरी. विद्यार्थी . यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे .
वारंवार तक्रारी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने दुरुस्तीस सुरुवात करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment
0 Comments