दर्यापूर-अकोट मार्गावरील माहेश्वरी भवन परिसरात झालेल्या भीषण अपघातात प्राचार्य डॉ. बालासुब्रमणी नचिमुथू (रा. तामिळनाडू) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते गुरुकुल बीएससी नर्सिंग कॉलेज, शिव रोड, दर्यापूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. या अपघातामुळे शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. डॉ. नचिमुथू हे आपल्या दुचाकी (बुलेट) क्रमांक टीएन ३८ सीपी ५३१६ ने काही कामानिमित्त दर्यापूर-अकोट मार्गावरून जात होते. दरम्यान माहेश्वरी भवनाजवळ त्यांच्या दुचाकीचा ट्रक क्रमांक एमएच ४९ बिझेड १२२५ च्या मागील भागाला जोरदार थडक बसली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात घडले असून, तरीदेखील वाहतूक नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गुरुकुल बीएससी नर्सिंग कॉलेजमधील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली असून, सर्व स्तरांतून प्राचार्य डॉ. नचिमुथू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे
.


Post a Comment
0 Comments